Posts

Showing posts from 2019

मन हे प्रसन्न झाले.....

मन हे प्रसन्न झाले  खूप दिवसांनी माझ्या कट्ट्यावर बसून , पाखरांचा आवाज ऐकुन, निसर्गाला बहरताने बघून, चिमण्यांची किलबिलाट ऐकुन, सुतराच घरट बांधताना बघून. मन हे प्रसन्न झाले कामाच्या व्यापातून बाहेर येऊन, सर्व मनातील विचार बाजूला ठेऊन, एकांतात बसून, निसर्गाचा आनंद घेणून. मन हे प्रसन्न झाले हृदयातील बोल ऐकुन, सकाळी सकाळी सुंदर गाण्याच्या ओवी ऐकुन, माझ्या लेखणीत नवीन दृश्य टाकून, माझ्याच कल्पणामध्ये अडकून.                         #Writer - #Kanchan #Gade                   

मैत्री......

आपली मैत्री जस नव्याने अंकुरलेल पान, दोन हृदयात जोडलेली रेशमाची गाठ, नकळत हसणारी,नकळत रुसनारी, आपल्यावर हक्क दाखवणारी . आपली मैत्री जणू आशेच पान, काही मी लिहलेले,काही तु लिहलेले, काही समाजाने त्यात मजकूर कोरलेले, काही भविष्याने त्यात साद घातलेले. आपली मैत्री जणू संभाजीनगर ची शान, गणपती विसर्जन ला फुललेली, मनात सजलेली,प्रेमात रुजलेली, हसत खेळत चाललेली,विश्वात नांदलेली . आपली मैत्री जणू आयुष्याचं पान, स्वप्नांनी रंगलेली,स्वतमध्ये गुंतलेली, तू तुझ्या वाटेवर मांडलेली, मी माझ्या वाटेवर मांडलेली, शेवटी एका ध्येयावर गाठलेला संदुर थाट.                       #Writer -#Kanchan #Gade.