Posts

Showing posts from 2020

#पानवरा...

Image
पावसाच्या आधीचा पानवरा.... पाऊस येण्याची दस्तक.... थंडगार ...मनमोहक....हवा.. लांबून आलेला मातीचा सुगंध... सर्वांची धावपळ.... पाखरांची...घरट्याकडे लागलेली ओढ... धुंदली... धूंदली सि नजर... आणि मी..या सर्वांमध्ये...घेतलेला आनंद...गगनात न मावणारा... चहाचा घोट....आणि या मला सुचलेल्या ओळी...                            -Kanchan Gade

#बेधुंद #नशा

Image
#मन नाहीये कशात...कुठे आपलेपणा नाहीये..कुणी आपलंसं नाहीये...कुणाचं नाव सुचत नाहीये...कुणाजवळ मन मोकळं करू शकत नाहीये.... मोठ्याने ओरडवा वाटलं तरी ओरडू शकत नाहीये...डोक्यातील विचार कुठ ठेऊ शकत नाहीये...काम करून...मनाचे समाधान भेटत नाहीये.... सर्वांच्या पुढे पुढे करून.. मान सन्मान भेटत नाहीये... वेदने पासून सुटका भेटत नाहीये....पाठीला जरासा आराम भेटत नाहीये....नाकाला चांगला श्वास भेटत नाहीये.... उंच उडता येत नाहीये...आकाशात भरारी घेता येत नाहीये...सर्व काही वाटून ....करता येत नाहीये....मनाला आता आवर घालत येत नाहीये... स्वतःच्या भावना लपवल्या जात नाहीये...काहीस..हवं असून मागता येत नाहीये....जीव गुदमरून....दाखवता येत नाहीये...मरायला झालं..तरी कुणाजवळ सांगू शकत नाहीये...मन मोकळं करायला अता जागा भेटत नाहीये..... मला पाखरं सारखं उडता येत नाहीये...हवेला मिठी मरता येत नाहीये...काजव्याला केसांची शोभा वाढवता येत नाहीये... रात किड्याला चांगला गाणं गाता येत नाहीये... पायाची शिर फडफड उडून सुध्धा डोळ्यांना दिसत नाहीये.... आदृश् होयच असून...शक्ती भेटत नाहीये ...मनात असंख्य इच्छा असून...

@#काल्पनिक कट्ट्यावरचे Thoughts

कसली तरी कमी जाणवत होती तिच्या प्रेमात... तिच्या बोलण्यात..तिच्या वागण्यात... खूपदा आढावा घेवा वाटलं...पण जवळची आहे म्हणून सोडून दिलं... पहिल्या पासून तिने मला अपनावल होत...तिच्या मनातून पण कधी जाणवलं च नाही.... हळू हळू तिच्या स्वभावात बदल झाले होते....न कळतच ती दुरावली होती...शरीराने जरी इथ असली तरी...मनाने कुठेतरी दुसरीकडेच होती.... आता तिने माझी जागा दुसऱ्या कुणाला तरी दिली होती... त्या घरटयामध्ये आता बरेच लोक राहत होती... ती खूप प्रयत्न करत होती मला न जाणून द्यायचे..पण मला ते पूर्णपणे जाणवत होत... जेव्हा दुसऱ्यासाठी तीच प्रेम दिसायचा तेव्हा आपल्या स्वभावतच काहीतरी चूक झाली असावी ..अस वाटू लागलं.... माझ नाव तिच्या मनातल्या लेखणीत कधीच न दिसता दुसऱ्याचं मात्र नेहमी दिसायचा.....तेव्हा जीवाची लाहीलाही होयची... अन् मी ही मुकाटपणे सर्व काही बघत बसायची...आतल्याआत सर्वकाही सहन करत होते...बोलून दाखवायची मनाला कधी हिम्मत होत नव्हती... ....कारण मला माझी चांगली जिवलग गमवायची नव्हती... खूपदा राग यायचा मला तिच्या वागण्याचा...पण मी दुर्लक्ष करून द्यायचे ....भांडण तर नकोच...अस माझ नेहमी ध्येय असाय...

#सगळ्यांना फेबुरवरी चे दिवस माहित आहे अन् मला गरीबितले दिवस माहित आहेत....

#सगळ्यांना फेबुरवरी चे दिवस माहित आहे अन् मला गरीबितले दिवस माहित आहेत.... तुम्हाला डायनिंग टेबलवर बसून जेवायचे माहित आहे अन् मला हातावर भाकरी घेऊन जेवायचं माहीत आहे... थंडीत अंगावर शाल घेऊन झोपायच तुम्हाला माहीत आहे अन् मला रात्री जागून शेतात पाणी भरायच माहित आहे... एक एक पैसा न विचार करता कसं उधळायच हे जरी तुम्हाला माहीत असलं...तर तोच एक एक पैसा कसा जपायचा हे मला माहीत आहे.... लेकराने हट्ट केल्यावर त्याचा तुम्ही हट्ट पुरवत असाल....पण मला लेकराला गरिबी समजून सांगणं माहीत आहे... #सगळ्यांना फेबुरवरी चे दिवस माहित आहे अन् मला गरीबितले दिवस माहित आहेत.... दिवस रात्र तुम्ही ही काम करता अन् मी ही काम करतो.....पण मला त्या अक एक घामाच्या थेंबाची किंमत मला माहीत आहे... AC मध्ये बसून पगार घेण्याचं तुम्हाला माहीत आहे अन् इवध राब राब राबून माला ला हमी भाव कमी घेणं माहित आहे ..... #सगळ्यांना फेबुरवरी चे दिवस माहित आहे अन् मला गरीबितले दिवस माहित आहेत....                         #Writer-#Kanchan #Gade         ...

#किती सांगू मी माझ्या मनाची व्यथा...

कधी इथ तर कधी तिथं असतं.... कधी वाऱ्याची झुळूक होऊन उडत जात .. .. कधी प्रवाहा सोबत वाहत जात.... अन् शेवटी एका समुद्राला जाऊन मिळत... समुद्राला मिळाल्यावर सुध्धा तेथील गोष्टींचा आनंद घेत... कधी ह्या घरी तर कधी त्या घरी फिरत राहत... नकळत दुसऱ्यांना आनंद देऊन जात... अन् शेवटी एका जागेवर येऊन बसत... अका जागेवर बसून सुध्धा हसत राहत... न बोलता सर्व काही सांगून जात ... जस त्याचं रूप बोलत ... अन् शेवटी दुसऱ्याचं होऊन राहत.. दुसऱ्याचं होऊन सुध्धा आपले पणा जाणत... आकाशात उंच भरारी घेऊन सर्वस्व कमावून दाखवत .... आई वडिलांची मान ताट होईल अस वागून दाखवत... अन् शेवटी आपलं नाव आणि काम मागे ठेऊन जात..                   #Writer -#Kanchan #Gade.                     

@ #सुगंध #पुष्प @

हळू हळू फुलत जातोस..तुझा सुगंध दरवत जातो... नकळत हवेचा स्पर्श होवा तसा तुझ्या सुगंधाचा होतो... बेधुंद होते मी...जेव्हा तू कुणाच्या केशात मावळून सुध्धा दरवळत राहतो... तुला पाहतच राहावे इतके गोड तुझे रूप असते...डोळे लुप्त होतात येवढे सुंदर तुझे रंग असते... सुर्याहून तेज तुझा सुगंध असतो.... मोत्याहून आकर्षक तू आणि तुझे अस्तित्व असते .                                                     #Writer -#Kanchan #Gade