@#काल्पनिक कट्ट्यावरचे Thoughts
कसली तरी कमी जाणवत होती तिच्या प्रेमात...
तिच्या बोलण्यात..तिच्या वागण्यात...
खूपदा आढावा घेवा वाटलं...पण जवळची आहे म्हणून सोडून दिलं...
पहिल्या पासून तिने मला अपनावल होत...तिच्या मनातून पण कधी जाणवलं च नाही....
हळू हळू तिच्या स्वभावात बदल झाले होते....न कळतच ती दुरावली होती...शरीराने जरी इथ असली तरी...मनाने कुठेतरी दुसरीकडेच होती....
आता तिने माझी जागा दुसऱ्या कुणाला तरी दिली होती...
त्या घरटयामध्ये आता बरेच लोक राहत होती...
ती खूप प्रयत्न करत होती मला न जाणून द्यायचे..पण मला ते पूर्णपणे जाणवत होत...
जेव्हा दुसऱ्यासाठी तीच प्रेम दिसायचा तेव्हा आपल्या स्वभावतच काहीतरी चूक झाली असावी ..अस वाटू लागलं....
माझ नाव तिच्या मनातल्या लेखणीत कधीच न दिसता दुसऱ्याचं मात्र नेहमी दिसायचा.....तेव्हा जीवाची लाहीलाही होयची...
अन् मी ही मुकाटपणे सर्व काही बघत बसायची...आतल्याआत सर्वकाही सहन करत होते...बोलून दाखवायची मनाला कधी हिम्मत होत नव्हती... ....कारण मला माझी चांगली जिवलग गमवायची नव्हती...
खूपदा राग यायचा मला तिच्या वागण्याचा...पण मी दुर्लक्ष करून द्यायचे ....भांडण तर नकोच...अस माझ नेहमी ध्येय असायचं...लांब झाले तर गोडव्यामध्येच होवा नाहीतर होऊच नाही अस माझं नेहमी सिद्धांत असायचं..... माझ्याकडून कधी नाती तुटू नयेत हा माझा खोलपासून प्रयत्न असायचं...
मी नेहमी तिच्या सोबत असून सोबत नसल्याचा जाणवायचं....पण मन पुन्हा समजून सांगायचं...आणि माझं रोजचं कामकाज चालायचं....चिडचिड तर खूप होयचि माझी.....पण स्वतःवरच काढून पुढे चालायचं....अन् जीवन जगायचं म्हणून जगायचं....
कधी हट्ट करायची मला संधी मिळाली नाही .....कारण माहित होत...म्हणून कधी मी त्या वाटेला निघालेच नाही...
खूप काटे दिसले वाटेत...पण त्यांना बाजूला करून..चालत राहायच......चालता चालता थकून जायचं....पण पुन्हा स्वतःलाच समजाऊन ..काडीचा आधार घेऊन तीरावर येऊन उभ राहायच......
#Writer-#Kanchan #Gade.
Comments
Post a Comment