#सगळ्यांना फेबुरवरी चे दिवस माहित आहे अन् मला गरीबितले दिवस माहित आहेत....

#सगळ्यांना फेबुरवरी चे दिवस माहित आहे अन् मला गरीबितले दिवस माहित आहेत....

तुम्हाला डायनिंग टेबलवर बसून जेवायचे माहित आहे अन् मला हातावर भाकरी घेऊन जेवायचं माहीत आहे...
थंडीत अंगावर शाल घेऊन झोपायच तुम्हाला माहीत आहे अन् मला रात्री जागून शेतात पाणी भरायच माहित आहे...

एक एक पैसा न विचार करता कसं उधळायच हे जरी तुम्हाला माहीत असलं...तर तोच एक एक पैसा कसा जपायचा हे मला माहीत आहे....
लेकराने हट्ट केल्यावर त्याचा तुम्ही हट्ट पुरवत असाल....पण मला लेकराला गरिबी समजून सांगणं माहीत आहे...
#सगळ्यांना फेबुरवरी चे दिवस माहित आहे अन् मला गरीबितले दिवस माहित आहेत....

दिवस रात्र तुम्ही ही काम करता अन् मी ही काम करतो.....पण मला त्या अक एक घामाच्या थेंबाची किंमत मला माहीत आहे...
AC मध्ये बसून पगार घेण्याचं तुम्हाला माहीत आहे अन् इवध राब राब राबून माला ला हमी भाव कमी घेणं माहित आहे .....
#सगळ्यांना फेबुरवरी चे दिवस माहित आहे अन् मला गरीबितले दिवस माहित आहेत....

                        #Writer-#Kanchan #Gade

Comments

Popular posts from this blog

#गावातला आनंद शहरात कसला....

#मी पीएमपीमएल प्रवासी....

#चांदणी रात्र..ती....आणि आयुष्य..