मन हे प्रसन्न झाले.....

मन हे प्रसन्न झाले  खूप दिवसांनी माझ्या कट्ट्यावर बसून ,
पाखरांचा आवाज ऐकुन,
निसर्गाला बहरताने बघून,
चिमण्यांची किलबिलाट ऐकुन,
सुतराच घरट बांधताना बघून.

मन हे प्रसन्न झाले कामाच्या व्यापातून बाहेर येऊन,
सर्व मनातील विचार बाजूला ठेऊन,
एकांतात बसून,
निसर्गाचा आनंद घेणून.

मन हे प्रसन्न झाले हृदयातील बोल ऐकुन,
सकाळी सकाळी सुंदर गाण्याच्या ओवी ऐकुन,
माझ्या लेखणीत नवीन दृश्य टाकून,
माझ्याच कल्पणामध्ये अडकून.

                        #Writer - #Kanchan #Gade
                  

Comments

Popular posts from this blog

#गावातला आनंद शहरात कसला....

#मी पीएमपीमएल प्रवासी....

#चांदणी रात्र..ती....आणि आयुष्य..