मैत्री......
आपली मैत्री जस नव्याने अंकुरलेल पान,
दोन हृदयात जोडलेली रेशमाची गाठ,
नकळत हसणारी,नकळत रुसनारी,
आपल्यावर हक्क दाखवणारी .
आपली मैत्री जणू आशेच पान,
काही मी लिहलेले,काही तु लिहलेले,
काही समाजाने त्यात मजकूर कोरलेले,
काही भविष्याने त्यात साद घातलेले.
आपली मैत्री जणू संभाजीनगर ची शान,
गणपती विसर्जन ला फुललेली,
मनात सजलेली,प्रेमात रुजलेली,
हसत खेळत चाललेली,विश्वात नांदलेली .
आपली मैत्री जणू आयुष्याचं पान,
स्वप्नांनी रंगलेली,स्वतमध्ये गुंतलेली,
तू तुझ्या वाटेवर मांडलेली, मी माझ्या वाटेवर मांडलेली,
शेवटी एका ध्येयावर गाठलेला संदुर थाट.
#Writer -#Kanchan #Gade.
Nice
ReplyDeleteSo nice thinking ..all lines are meaningful .. great
DeleteAll the best Di
Nice
DeleteThank u all for such beautiful comments and reading my poem line by line.
ReplyDelete